Meesho वर पैसे कसे कमवायचे? स्वतःचा व्यवसाय सुरू करा

How to Earn Money From Meesho: तुम्हालाही प्रश्न पडला असेल की Meesho मधून पैसे कसे कमवायचे? तर काळजी करू नका. तुम्ही घरबसल्या स्वतःचा ऑनलाइन व्यवसाय सुरू करू शकता. आज आपण प्रत्येक गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग, सुरुवात करूया.

Meesho वर तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट विकून चांगले पैसे कमवण्याची संधी मिळते. तुम्ही कपडे, किचनचे प्रॉडक्ट, बॅग आणि घरगुती सामान अशा अनेक वस्तू विकू शकता. वस्तू विकल्यानंतर त्यातून मिळालेल्या पैशांतून खरेदीची किंमत आणि इतर खर्च वजा करा. त्यानंतर जी रक्कम उरते, तो तुमचा नफा समजायचा.

1.मीशोवर विक्रेता (Seller) कसे बनायचे?

Meesho वर तुमचे प्रॉडक्ट विकून तुम्हाला विक्रेता बनायचं असेल, तर सर्वात आधी Meesho Supplier या अधिकृत वेबसाइटवर जा आणि नोंदणी करून घ्या. त्यानंतर तुम्ही तुमच्याकडील वस्तू वेबसाइटवर लिस्ट करू शकता.

नोंदणी झाल्यानंतर तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक प्रॉडक्टचे स्पष्ट आणि चांगल्या दर्जाचे फोटो काढा. शक्य असल्यास प्रत्येक अँगलमधून फोटो घ्या, म्हणजे ग्राहकांना वस्तू व्यवस्थित पाहता येईल.

त्यानंतर प्रॉडक्टची किंमत आणि त्याची संपूर्ण माहिती म्हणजेच डिस्क्रिप्शन व्यवस्थित अपलोड करा. नोंदणी करताना वेबसाइटवर दिलेल्या अटी आणि नियम काळजीपूर्वक वाचा आणि त्यांचे पालन करा. अशा प्रकारे तुम्ही तुमचा ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढची पायरी सहज पार करू शकता.

2.मीशोवर कोणत्या वस्तू विकून पैसे कमवता येतात?

तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की मीशोवर असे कोणते प्रॉडक्ट असतील, ते विकून आपल्याला खरोखर पैसे कमावता येतील? तर सांगतो तुम्हाला.

हे बघा मीशोवर साधारण लेडीजचे कपडे, लहान मुलांचे कपडे, किचनचे प्रॉडक्ट, घर सजावटीच्या वस्तू अशा अनेक वस्तू उपलब्ध आहेत.

पण मुख्य गोष्ट अशी आहे की, माझ्या म्हणण्यानुसार आणि माझ्या अनुभवानुसार, आपण जे प्रॉडक्ट लिस्ट करतो ना, त्या प्रॉडक्टला ग्राहकांची मागणी किती आहे, खरेदी किंमत काय आहे आणि त्या प्रॉडक्टबद्दल स्पर्धा काय आहे, हे सर्व व्यवस्थित तपासून घ्या.

म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट विकायला चांगलं राहील. सुरुवातीला काय करा तुम्ही कमी प्रमाणात माल घ्या. अगोदर कस्टमर म्हणजेच ग्राहकांचा प्रतिसाद बघा, काय येतो. त्यानंतरच मग पुढचं पाऊल उचला. तेच फायदेशीर ठरेल.

3.मीशोमधून किती पैसे कमवता येतात? (नफ्याचे उदाहरण)

मीशोमधून किती पैसे कमवता येतात, तर तुम्हाला मी उदाहरणासहित सांगतो.

जर समजा एखादी वस्तू तुम्हाला 150 रुपयांना मिळाली आणि ती वस्तू तुम्ही 220 रुपयांना विकली, तर किमतीतील फरक 70 रुपये होतो.

आता त्यातून अंदाजे 25 रुपये खर्च वजा केला, तर किती नफा मिळतो? मग बघा प्रत्यक्षात तुम्हाला 45 रुपये नफा मिळतो.

त्यामुळे जर तुम्ही अशा 100 वस्तू विकल्या, तर तुम्हाला एकूण किती नफा होईल, याचा विचार करा 4,500 रुपये होईल.

म्हणजेच, How to Earn Money From Meesho मधून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. जर तुम्ही व्यवस्थित प्रॉडक्ट लिस्ट केले आणि त्या प्रॉडक्टची मागणी व किंमत व्यवस्थित ठरवली, तर तुम्हाला खरंच चांगला फायदा होऊ शकतो.

हे मी स्वतः सर्व केलेलं आहे आणि माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगत आहे. जर तुम्हालाही अशा प्रकारे काम करण्याची इच्छा असेल, तर नक्की करून बघा.

तपशील (Details)रक्कम (रुपये)
प्रॉडक्टची खरेदी किंमत (Cost Price)₹१५०
प्रॉडक्टची विक्री किंमत (Selling Price)₹२२०
किंमतीतील फरक (Gross Margin)₹७०
अंदाजे पॅकिंग व इतर खर्च (Expenses)₹२५
प्रत्यक्ष निव्वळ नफा (Net Profit per Piece)₹४५

4.मीशोवर व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

मीशोवर तुमचा धंदा चालू करायचा असेल ना, तर त्यासाठी अगोदर तुम्हाला नोंदणी करावी लागेल. त्यासाठी तुमचा एक मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.

त्यानंतर तुमचा मेल आयडी आणि पेमेंट अकाउंटमध्ये पैसे घेण्यासाठी एक बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच, तुमचा जो धंदा असेल ना, त्या संदर्भात सविस्तर माहिती असणे आवश्यक असते.

जेव्हा नोंदणी कराल ना, तेव्हा मीशोची अधिकृत वेबसाईट बघा आणि कागदपत्रांची यादी तपासून घ्या.

आणि जास्त काही फार लागत नाही फक्त एवढ्या गोष्टी असणे खूप आहे. नंतर मग तुम्ही तुमचं काम नियमितपणे चालू करू शकता.

5.मीशोमधून पैसे कमवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

तुम्हाला मनापासून मीशोमधून पैसे कमवायचे असतील ना, तर मी तुम्हाला या महत्त्वाच्या टिप्स सांगतो. त्या तुम्ही नक्की फॉलो करा.

1.ग्राहकांची गरज ओळखा सर्वात अगोदर म्हणजे तुमच्या कस्टमरला, म्हणजेच ग्राहकांना ज्या वस्तूची जास्त गरज आहे आणि ज्या वस्तू त्यांना उपयोगी पडतील, अशाच वस्तू निवडा. उगाच काही पण निवडू नका.

2.प्रॉडक्टचे फोटो आणि डिस्क्रिप्शन व्यवस्थित ठेवा जे पण तुम्ही प्रॉडक्ट लिस्ट कराल ना, त्याचे फोटो एकदम स्पष्ट असले पाहिजेत. चारही अँगलमधून फोटो अचूक असू द्या, म्हणजे कस्टमर प्रॉडक्ट व्यवस्थित बघून काळजीपूर्वक खरेदी करतो. त्याचबरोबर प्रॉडक्टचे डिस्क्रिप्शनसुद्धा एकदम व्यवस्थित आणि वास्तव माहिती देणारे ठेवा.

3.प्रॉडक्टची योग्य किंमत ठरवा तुम्ही जी वस्तू विकत आहात, तिची बाजारामध्ये किती किंमत आहे, ती बघा. तुमच्या हिशोबाने उगाच काहीही किंमत ठरवू नका. अगोदर योग्य किंमत तपासा आणि त्यानंतर बाजारभावानुसार तुमच्या प्रॉडक्टची किंमत ठरवा. कारण अचूक किंमत ठरवणं खूप गरजेचं आहे.

4.खर्च आणि नफा मोजून घ्या तुम्ही ज्या वस्तू विकता, त्यांचा विक्री खर्च आणि त्यातून मिळणारा नफा मोजून घ्या. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात किती नफा मिळतो, याचा अंदाज येईल. त्यानंतर ज्या वस्तूवर तुम्हाला जास्त नफा मिळतो, ती वस्तू विकण्यावर तुम्ही अधिक लक्ष देऊ शकता.

5.ग्राहकांना चांगली सेवा द्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कस्टमरने ऑर्डर दिल्यानंतर ती वेळेवर पाठवत जा. मागेपुढे करू नका. तसेच, तुमच्या वस्तूंचा दर्जा म्हणजेच क्वालिटी व्यवस्थित ठेवा, जेणेकरून ग्राहकांना तुमची सेवा आवडेल आणि ते पुन्हा तुमच्याकडून खरेदी करू शकतील. यामुळे तुम्हाला भविष्यात आणखी फायदा होऊ शकतो, हे नेहमी लक्षात ठेवा.

Conclusion

मीशोमधून पैसे कमवण्यासाठी योग्य उत्पादने निवडा, खर्चाचा हिशोब ठेवा आणि ग्राहकांना चांगली सेवा द्या. सुरुवातीला कमी प्रमाणात व्यवसाय सुरू करा आणि ग्राहकांचा प्रतिसाद पाहून विक्री वाढवा. योग्य नियोजन आणि सातत्य ठेवल्यास मीशोवर तुमचा ऑनलाइन व्यवसाय विकसित करण्याची संधी मिळू शकते.

Online Madhubabu Pension Yojana Apply Marathi: दरमहा पेन्शन मिळवण्यासाठी असा करा अर्ज!

Conclusionवारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1] मीशोवर पैसे कमवण्यासाठी GST आवश्यक आहे का?

GST ची आवश्यकता तुमच्या व्यवसायाच्या स्वरूपावर आणि लागू नियमांवर अवलंबून असते. काही पात्र विक्रेत्यांना विशिष्ट अटींनुसार सूट मिळू शकते. त्यामुळे नोंदणीपूर्वी मीशोचे अधिकृत नियम तपासा.

2] मीशोमधून मिळालेले पैसे बँक खात्यात कसे मिळतात?

ऑर्डरशी संबंधित अटी पूर्ण झाल्यानंतर मीशोच्या नियमानुसार विक्रीचे पैसे नोंदणीकृत बँक खात्यात जमा केले जातात. पेमेंटची वेळ आणि अटी विक्रेता खात्यात तपासता येतात.

Leave a Comment